देवरीत वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

0
23

गोंदिया,दि.30-देवरी तालुक्याच्या पालांदूर जमीदारी येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी वनकर्मचारी जंगलात पेट्रोलिंग करीत असताना ही घटना उघडकीस आली.
वाघ हा वृद्ध असल्याची माहिती असून, वृद्धत्वामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी कुजलेल्या अवस्थेतीतील वाघाचे सर्व अवयव विखुरलेले होते. नखे शाबूत होती. त्यामुळे शिकारीचा प्रयत्न झाला नसावा, असेही बोलले जाते. दरम्यान, वाघाचे सर्व अवयव एकत्र गोळा करून जागीच दफनविधी करण्यात आला.
घटनास्थळी डीएफआे प्रमोदकुमार पंचभाई, एसीएफ योगेंद्र सिंग, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.