भंडारा गोंदिया– ११ भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूकीत १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.कॉंग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांचा अर्ज कायम राहिल्याने चुरस वाढणार आहे.
22 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले. त्यापैकी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे 3 अर्ज, नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्ष्यांच्या उमेदवारांचे 4 अर्ज तर 15 अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेताना ४ अर्ज मागे घेण्यात आले.त्यात तुलशीदास गेडाम, कविश्वर काटेखाये, सुहास फुंडे, देवदत्त करंजेकर यांचा समावेश आहे. सेवक वाघाये निवडणुकीत स्टॅण्ड राहिल्याने. निवडणुकीत रंगत वाढणार. आहे.ओबीसी सेवा संघाचे प्रदिप ढोबळे हे सुध्दा रिंगणात आहेत.
*हे उमेदवार आहेत भंडारा -गोंदिया लोकसभेच्या रिंगणात*
डॉ. प्रशांत यादव पडोळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुनील बाबुराव मेंढे (भारतीय जनता पार्टी), संजय भैय्या कुंभलकर (बहुजन समाज पक्ष), अजय कुमार भारती (अखिल भारतीय परिवार पक्ष), देवीलाल सुखराम नेपाळे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), विलास बाबुराव मेंढे (भारतीय जनता पक्ष). लेंढे (लोक स्वराज्य पक्ष), संजय गजानन केवट (वंचित बहुजन आघाडी), तुळशीराम गेडाम (अपक्ष), डॉ. प्रकाश मधुकर जिबकाते (अपक्ष), शरद मार्तंड इतवाले (अपक्ष), चैत्राम दशरथ कोकासे (अपक्ष), प्रदीप ढोबळे (अपक्ष), बेनिराम फुलबांधे (अपक्ष), वीरेंद्रकुमार कस्तुरचंद जैस्वाल (अपक्ष), विलास जियालाल राऊत (अपक्ष), सुमित विजय विजय पांडे (अपक्ष), सूर्यकिरण ईश्वर नंदागवळी (अपक्ष), सेवकभाऊ निर्धन वाघाये (अपक्ष).