क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना महावितरणचे अभिवादन

0
4

नागपूर दि. 11 एप्रिल :- महान समाज क्रांतिकारक, यशस्वी उद्योजक, विचारवंत, लेखक, प्रकाशक आणि गोरगरीब, शेतकरी व बहुजन समाजाचे उद्धारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

महावितरणच्या काटोल मार्गवरील विद्युत भवन कार्यालयात झालेल्या या जयंती कार्यक्रमाच्यावेळी महावितरण़च्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता  दिलीप दोडके यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता विजय बारंगे, अधीक्षक अभियंता किशोर सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता सतीश भामसे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन केले.