शिक्षणाची गुढी उभारून जि .प.शाळा, अर्जुनी/मोर क्र.१ इयत्ता पहिलीत प्रवेशारंभ

0
4

अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे)
शैक्षणिक सत्र २०२४-२५ यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी मोर क्रमांक-१ येथे, ‘गुढीपाडवा- प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत शिक्षणाची गुढी उभारून इयत्ता पहिलीत मोफत प्रवेशारंभ स्वागत समारंभ कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, गणित परिसर अभ्यास यावर आधारित विविध शैक्षणिक साहित्याप्रदर्शन भरवण्यात आले. सदर साहित्य प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुषमाताई झोडे ,उपाध्यक्ष तेजस्वी कापगते ,अर्जुनी मोरगावचे केंद्रप्रमुख सु .मो .भैसारे यांचे हस्ते करण्यात आले . विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित केलेले शैक्षणिक साहित्य व त्यांचे केलेले सादरीकरण निश्चितच कौतुकास्पद होते यावर मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख सु .मो. भैसारे यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न तसेच शासनाने पी एम श्री योजनेअंतर्गत शाळेला पुरविलेल्या विविध भौतिक सुविधा यामुळे शाळेला गतवैभव मिळत असून, एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण नामांकित शाळा निर्माण होत असल्याचे जनमानसातून सूर उमटत असल्याचे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशारंभ ,स्वागत तसेच शिक्षणाची गुढी उभारून “गुढीपाडवा- प्रवेश वाढवा” हा कार्यक्रम घेण्यात आला.व इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले .
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थि होते.कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका कु. सरिता घोरमारे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,नरेंद्र बनकर , कु. नमिता लोथे , सौ. अरूणा झोळे , गीता चाचेरे , किरण हातझाडे आदींनी सहकार्य केले.