मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याचे उद्दिष्ट – जिल्हाधिकारी प्रजीत नायर

0
4

अर्जुनी मोर. – दिनांक 19 एप्रिल ला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात पहिल्याच टप्प्यात होणारे मतदान यशस्वीरित्या, कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीशिवाय पार पाडणे हेच आपले उद्दिष्ट आहे. त्याकरिता विविध पातळीवर शासकीय यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत. कोणतीही अडचण आली तरी त्वरित त्याचे निवारण करून मतदानाची ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडायची आहे, असे मत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी  प्रजीत नायर यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रात नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणुकीच्या पूर्व तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. एकूण मतदान केंद्रे, मतदान अधिकारी यांच्या जण्यायेण्याची पुरेशी व्यवस्था, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, इ. विषयी त्यांनी जाणून घेतले.
यानंतर त्यांनी एस. एस. जे. महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाला भेट दिली. प्रशिक्षणाचे कार्य योग्य रित्या सुरू असल्याची त्यांनी खात्री केली. तसेच कर्तव्यावर असलेल्या मतदान अधिकारी यांच्या पोस्टल ballet मतदान केंद्राला सुद्धा त्यांनी भेट दिली. सर्व कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सडक अर्जुनी चे तहसीलदार अक्षय पोयाम हे उपस्थित होते.