गोंदियात डॉ आंबेडकर जयंती निमित्त लाखाने विकले पांढरे शुभ्र वस्त्र

0
8

गोंदिया ता.14 एप्रिल :-दरवर्षी प्रमाणे गोंदियात याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येत असून आंबेडकरी अनुयायी पांढरी शुभ्र वस्त्र धारण करून ही जयंती साजरी करतात. परिणामी याचे औचित्य साधून गोंदियात सुमारे लक्षावधी रुपयाचे पांढरी शुभ्र वस्त्र आंबेडकरी अनुयायांनी खरेदी केलेली आहेत.व्यापाऱ्यानेही आंबेडकरी जनतेची भावना ओळखून मुंबईवरून ही कापड खरेदी केल्याचे सांगितले.या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्य जॅकेट, कुर्ती, सलवार, शर्ट, टी शर्ट, यांचा समावेश आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, बाबासाहेबांची स्वाक्षरी, धम्मचक्र, आदि निळ्या रंगात कोरीव Embroidery print करण्यात आलेली आहे. हे कपडे 500 रुपयाला मिळत असून संपूर्ण कुटुंब सुमारे दोन ते तीन हजार रुपयाला खरेदी करतात. हे खरेदीचे काम गेल्या आठवडाभरा पासून सुरु असून 13 एप्रिल रोजी गोंदियाच्या बाजारात पाय मांडण्याची जागा नव्हती.एका दुकानदाराने माध्यमाला दिलेल्या माहिती नुसार त्यांनी मुंबईवरून सुमारे दोन लक्ष सत्तर हजार रुपयाचे कपडे खरेदी करण्यात आल्याचे सांगितले.त्यापैकी आता फक्त 25 हजाराचे कपडे शिल्लक असून उद्या पर्यंत त्यांची विक्री करण्यात येईल, असे सांगितले.