गोंदिया जिल्ह्यात दि.19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदान पार पडले.जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात मतदान करतेवेळी बुथवरील अधिकारी व कर्मचारी तसेच मतदान करण्यासाठी येणार्या लोकांना उष्माघात संबधी आजार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांच्या सुचनेनुसार गावातील सर्व बुथवर व आरोग्य संस्थेत उष्माघात प्रतिबंधात्मक मेडीकल किट उपलब्ध करण्यात आले.सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या चारही विधानसभा कार्यक्षेत्रात उष्माघात प्रतिबंधात्मक मेडीकल किट्चा वापर बाबत मतदान स्थळी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत दि.19 एप्रिल रोजी सर्व आरोग्य संस्थाना अॅलर्ट देवुन वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी वर्गाला मुख्यालही राहण्याची सक्ती व आपले आरोग्य संस्था उष्माघात परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी प्रशासनामार्फत आपल्या पथकाद्वारे गावातील मतदान केंद्रावर आरोग्याच्या दृष्टीने अनुचित घटना व उष्माघात होवु नये यासाठी सतत पहारा ठेवण्यात आला.
दि.19 एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे भेट देऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संबधाने उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाहीची पाहणी केली.प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थापन केलेल्या कोल्ड रूम ची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी यांना सद्य स्थितीत जिल्ह्यात वाढत्या उष्माघात परिस्थिती बाबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना दिल्यात. मुख्यालय वास्तव, कोल्ड रूम कार्यान्वित करने, उष्माघात प्रतिबंधात्मक औषधी साठा, उष्माघात रिपोर्ट ई विविध बाबीवर चर्चा करून सूचना दिल्यात.यावेळी त्यांचे सोबत गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राम वरठी उपस्थित होते.