जनरल निरीक्षक विनय सिंग यांनी केले लाल बहादूर शास्त्री विशेष मतदान केंद्राचे निरीक्षण.

0
3

 भंडारा, दि. 19 : – 11 भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्यात विदर्भातील पाच मतदार  संघात आज शुक्रवारी निवडणूक होऊ घातली आहे. त्यापैकी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र आहे. भंडारा येथे मतदारांना विविध प्रकारच्या सोई सुविधा मतदारांना  निर्माण करण्यात आल्याअसून आज सकाळी जनरल निरीक्षक विनय सिंग यांनी लाल बहादूर शास्त्री या विशेष केंद्रावर (युनिक बुथ) जावून पहाणी केली.

           भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात लोकशाहीच्या उत्सवाला सकाळी 7 वाजतापासून सुरूवात झाली. मतदान केंद्रांना विविध आशयाद्वारे मतदारांना आकर्षीत करण्याकरीता नवे रुप देऊ सजविण्यात आले. याकरीता निवडणूक विभागच्या स्वीप टिमच्या सदस्यांनी ही जबाबदारी पार पाडली. नाविण्यपूर्ण कल्पनेतून लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्राला सजविण्यात आले.

         या केंद्रावर मतदानाकरीता आलेल्या मतदारांच्या पसंती हे केंद्र उतरले आहे. शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या भंडारा स्थित लालबहादूर शास्त्री विद्यालयाची वास्तु एकशे वीस वर्षापूर्वीची आहे. याच शाळेने उच्च पदावरील विद्यार्थी घडविले आहे.

         याच शाळेतील मतदान केंद्राची जिल्हा निवडणूक विभागाने विशेष मतदान केंद्र म्हणून निवड केली. जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी मा.श्री योगेश कुंभेजकर व जिल्हा स्वीप टीमचे नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा स्वीप टीमने या बुथवर नवनव्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरविल आहे. नव मतदार, वयोवृद्ध,महिला,पुरुषांसाठी सेल्फी पॉईंट, उभारण्यात आले. मतदानांकरीता आलेल्या मतदारांनी उत्साहाने व लोकशाहीचे पाईक म्हणून अनेकांनी या सेल्फी पॅाईंटवर मतदानानंतर सेल्फीचा आनंद घेतला.

           सोबतच एैतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूच्या प्रांगणात भंडारा जिल्ह्याची विशेष ओळख असलेल्या विशेष बाबी म्हणून,रेशीम उद्योग,भात लागवड,गोसेखुर्द प्रकल्प,कोका जंगल,डोंगरी बुजरुक खाण,अभयारण्ये, वन्यप्राणी,पवनराजा,आंबागडचा किल्ला, पांडे महाल,अशा विविध बाबींना चित्ररुपात  दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावलेले होते. रांगोळ्या, फुलांची आरास करुन बुध आकर्षकरित्या सजविण्यात आले होते..बुथच्या प्रवेशद्वारावर दोन मानवी वाघ भंडारा जिल्ह्यातील वन्यजीव सृष्टीचे प्रतिनिधीत्व करुन मतदारांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. सकाळी भंडारा जिल्ह्याचे जनरल निरीक्षक विनय सिंग यांनी या केंद्राला भेट दिली. नाविण्यपूर्ण् पध्दतीने सजविलेल्या या बुथचे निरीक्षण करून मा. सिंग यांनी निवडणूक विभागच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.

            या विशेष मतदान केंद्रावर मतदार करणाऱ्या व्यतीरिक्त अन्य नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी,निरीक्षक,पोलिस अधिक्षक यांनी या बुथचे निरीक्षण करुन समाधान व्यक्त केले. सेल्फी काढण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही.