धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट

0
21

बुलडाणा : जिल्ह्यातील डोणगाव ते लोणी मार्गावर धावणाऱ्या एका मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना आज, मंगळवारी दुपारी घडली. यामुळे रणरणत्या उन्हात अनेक वाहनधारक हा थरार पाहण्यासाठी जागीच थबकले. अनेक जणांनी तर पेटणारे वाहनाचे व्हिडीओ बनविले.मालवाहू वाहन मेहकर तालुक्यातील डोणगाव येथून लोणी येथे जात होते. वाहन धावत असतानाच त्याला आग लागली. पाहतापाहता हे वाहन उभे पेटले. कडक उन्हामुळे अशातच वाहनाचे इंजिन गरम झाले आणि शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीनंतर वाहनाचा सांगाडाच शिल्लक राहिला. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.