टीबी वॉर्डाच्या इमारतीवर होणार ‘हेलिपॅड’

0
8

नागपूर,दि..27-पुर्व विदर्भ आणि छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त भागात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमींना वाहनाद्वारे नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येते. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा व ते थेट नागपूर मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या इमारतीवर रुग्णांना उतरविण्याची योजना होती. मात्र, त्यावेळी याला कुणीच प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा ‘हेलिपॅड’साठी प्रयत्न होऊ घातले आहे. टीबी वॉर्डसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीवर ‘हेलिपॅड’ करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली आणि छत्तीसगडमधील काही भागात नक्षलवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात जखमी झालेल्या जवानांवर तत्काळ उपचार करण्यासाठी अनेकदा प्रशासनास अडचणी येतात. जवानांना रुग्णवाहिकेने ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये नेण्यास विलंब होतो. गेल्या वर्षीपासून गंभीर जखमींना हेलिकॉप्टरमधून विमानतळावर आणि तेथून एका खासगी इस्पितळात हलविले जात आहे. परंतु विमानतळ ते इस्पितळ यात बरेच अंतर आहे.