=काळीमाती धम्मभुमी येथे मुख्य कार्यक्रम
अर्जुनी मोर. =जगाला अहिंसा मैत्री व शांततेचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत भगवान बुद्ध यांचे जयंतीचे औचित्य साधून ता.23 मे रोजी बुध्द पोर्णिमा उत्सव अर्जुनी मोर. तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुध्द पोर्णिमेचा तालुकास्तरीय दोन दिवसीय उत्सव काळीमाती बुध्द भुमी येथे थाटात संपन्न झाला.
बुध्द पोर्णिमेनिमीत्य अर्जुनी मोर तालुक्यात सकाळ पासुनच बौध्द उपासक, उपासीकांनी शुभ्र वस्र परिधान करुन गावागावातील बुध्द विहारात प्रस्थान केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्जारोहण करुन बुध्द वंदना,व पंचशिल ग्रहण करण्यात आले. बुध्द पोर्णिमेचा तालुकास्तरीय दोन दिवसीय उत्सव काळीमाती बुध्द भुमी येथे थाटात संपन्न झाला. 22 मे रोजी रात्री 9 वाजता परित्रणपाठ व बुध्द पुजापाठ घेण्यात येवुन बुध्द वंदना व पंचशिल ग्रहण करण्यात आले. 23 मे रोजी सकाळी 8 वाजता धम्म ध्वजारोहन करण्यात आले. तथा बुध्दवंदना घेण्यात आली.त्यानंतर अल्पोपहार वितरण करण्यात आले. यावेळी हजारो बौध्द उपासक व उपासीकांनी काळीमाती बुध्द भुमी या नैसर्गिक स्थळाला भेट देवुन बुध्दाच्या विचारांची शिदोरी घेवुन शांतीच्या मार्गाने चालण्याची प्रतिंज्ञा घेतली.यावेळी बौध्द भंतेजींनी प्रवचणाचे माध्यमातुन बौध्द धम्माची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी उपासक, उपासीकांनी कटीबध्द राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.तसेच अर्जुनी मोर. येथील संबोधी बुध्द विहार संविधान चौक येथे एकता मंच तथा महिला समीतीच्या वतीने वैशाख बुध्द पोर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ध्वजारोहन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गेडाम यांचे हस्ते करण्यात आले.तसेच बुध्द वंदना व पंचशिल ग्रहण करण्यात आले.यावेळी महिला समीतीच्या अध्यक्ष अलकाताई शहारे, मनिषा लाडे,इंद्रकला रामटेके, मंगलाताई शहारे, जयश्री खोब्रागडे, योगिता चव्हाण, कुसुम बडोले, पुणम लाडे, चित्रलेखा शहारे, दिलीप लाडे,नाना शहारे व शेकडो समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.