सायकल रॅलीमध्ये 300 हून अधिक पोलीस अधिकारी,जेष्ठ नागरिक,युवा व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग

0
12

जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन

गडचिरोली,दि.०३ः– संयुक्त राष्ट्रसंघाने सन -2018 पासुन 03 जुन हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणुन घोषीत केलेला आहे. तेव्हा पासुन 03 जुन हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणुन जगभरात साजरा केला जातो. जागतिक सायकल दिनाचे अनन्य साधारण महत्व मागील दोन दशकांपासून संपूर्ण जगाने मान्य केले आहे. सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकुल अशी शाश्वत वाहतुकीचे साधन आहे. तसेच नेहमीच सायकल चालविणे शरीर स्वास्थासाठी फायदेशिर आहे. लोकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलीचा वापर करावा यासाठी दरवर्षी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो.

जागतिक सायकल दिनाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दि. 03 जुन 2024 रोजी सकाळी 06.00 वा. पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते इंदिरा गांधी चौकपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये  पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सायकल रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व सहभागी सायकलस्वरांना पोलीस दलाकडुन सहभागी प्रमाणपत्र देऊन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, सायकल दिन आहे म्हणुन सायकल चालवावी हा हेतु नसून सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही मोठ¬ा प्रमाणात संरक्षण होते. तसेच दररोज अर्धातास सायकल चालवले तरी आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते. यात प्रामुख्याने लठ्ठपणा, ह्द्यविकार, मानसिक आजार या आजारांपासुन रक्षण होते. याबाबत सायकलीचे महत्व पटवुन दिले आणि सर्वांना आपल्या निरोगी जिवनासाठी सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहीत करुन जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर सहभागी सभासदांना अल्पोपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासोबतच जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली जिल्ह्रातील संपुर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर व पोस्टे, उपपोस्टे, पोमके स्तरावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत मोठ¬ा संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक (अभियान)यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.