रामनगर परिसरात दिसून आली हिंदू- मुस्लिम एकता

0
5

नागरिकांनी हटविले अनाधिकृत फलक आणि झेंडे

गोंदिया : गोंदिया शहरातील रामनगर परिसरात हिंदू-मुस्लिम एकता एका आगळ्या वेगळ्या प्रकारे दिसून आली. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील नागरिकांनी अनाधिकृत नावाचे फलक आणि झेंडे लोकसहभागातून हटविण्यात आले. या सर्व फलक आणि झेंड्याच्या जागी आता लावणार येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरासाठी दोन्ही समाजातील नागरिकांनी पुढाकार दाखविला आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही समाजातील एकोपा दिसून आला. शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामनगर परिसरात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम यांच्या वास्तव्य आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम समाजातील विविध सण साजरे केले जातात. तर रामनगर चौकात मोठ्या प्रमाणावर अवैध नावाचे फलक आणि झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे रामनगर चौकातील परिसर हा विद्रूपीकरण झालेला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना पत्र देऊन संबंधित परिसरातील विद्रूपीकरण टाळण्यासाठी विनंती केली होती. त्या अनुषंगाने रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही समाजातील नागरिकांची सभा घेण्यात आली. त्या अनुषंगाने त्या दोन्ही समाजातील नागरिकांना याबाबतीत समजवण्यात आलं असता दोन्ही समाजातील नागरिकांनी समजूतदारपणा दाखवत परिसरातील अनाधिकृत फलक, झेंडे काढण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर आज संपूर्ण परिसर लोकसहभागातून काढण्यात आले. दोन्ही समाजातील नागरिकांनी पुढाकार दाखवीत त्या ठिकाणी आता परिसरात होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यासाठी लोकसहभागा तून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी लोकांनी संमती दर्शवली असून त्या ठिकाणी आता या अनाधिकृत फलक आणि झेंडे च्या जागी सीसीटीव्ही लागणार आहे. त्यामुळे परिसरात हिंदू-मुस्लिम एकताचे एक चांगले उदाहरण जिल्ह्यात पहावयास मिळणार आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.