खरी शिवसेना कुणाची? जनता ठरवणार?जनतेच्या कोर्टात शिंदे – ठाकरेंचा निकाल?

0
43

१३ मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने

मुंबई:-एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे महाराष्ट्रात महायुती आणि मविआत चुरशीचा सामना होणार असल्याचं चित्र आहे. मात्र या आघाड्यांच्या संघर्षात राज्यातल्या ४८ पैकी सर्वाधिक हाय होल्टेज ठरलेल्या १३ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण खरी शिवसेना कुणाची हे १३ मतदारसंघातले शिवसैनिक आणि जनता ठरवणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातल्या १३ जागांवर ठाकरे गट आणि शिंदे गटात सरळ लढत होते आहे. या मतदारसंघांमध्ये धनुष्यबाण सरस ठरणार की, मशाल याचीच परीक्षा या निवडणुकीत होत आहे.

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात सामना रंगणार आहे.

1) ठाणे – नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

2) उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर (शिंदे गट) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

3) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिंदे गट ) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

4) दक्षिण मुंबई – यामिनी जाधव (शिंदे गट ) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)

5) कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट ) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

6) मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे गट ) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

7) नाशिक – हेमंत गोडसे (शिंदे गट ) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) –

8) शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिंदे गट ) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

9) हातकणंगले – धैर्यशील माने (शिंदे गट ) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

10) छत्रपती संभाजीनगर – संदिपान भुमरे (शिंदे गट ) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

11) हिंगोली – बाबूराव कदम (शिंदे गट ) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)

12) बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिंदे गट ) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

13) यवतमाळ – वाशिम राजश्री पाटील (शिंदे गट ) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)

बरोबर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला सोपवलं. मात्र गेल्या दोन वर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे आयोगाचा निकाल सामान्य शिवसैनिक आणि जनतेला मान्य आहे का?याचीच कसोटी लोकसभा निवडणूक निकालात लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या १३ मतदारसंघांकडे लागलं आहे.