गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल ५३२८९ मतांची आघाडी घेतली आहे. यामुळे मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची चिंता वाढल असून आणखी मतमोजणीच्या १६ फेऱ्या शिल्लक असल्याने भाजपचे अशोक नेते आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. स्वतःचा मतदारसंघ असलेल्या आमगावातच डॉ. किरसान हे पिछाडीवर असून इतर पाचही विधानसभा क्षेत्रांत मात्र ते आघाडीवर आहेत.
डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस ) – 407158, अशोक नेते ( भाजपा ) – 316214 डॉ. किरसान आघाडी यांना ९०९४४ मतांची आघाडी
डॉ. नामदेव कीरसान २७४७८२ ,खा. अशोक नेते २२४१०० ,काँग्रेसचे डॉ.नामदेव कीरसान ५०६८२ मतांनी आघाडीवर..
गडचिरोली चिमूरगडचिरोली-चिमूर या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी लढत आहे. शहरातील कृषी महाविद्यालय इमारतीत मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे साडेदहा वाजता बाहेर आले. यात डॉ. नामदेव किरसान यांना अशोक नेते यांच्यापेक्षा तीन हजारांचे मताधिक्क्य होते. त्यानंतर दहा फेऱ्यापर्यंत किरसान यांनी ५० हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली. यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
अशोक नेते (महायुती)
पहिली फेरी 23,116
दुसरी फेरी 20,750
तिसरी फेरी 25462
चौथी फेरी 23372
पाचवी फेरी 20034
सहावी फेरी 20177
सातवी फेरी 20555
आठवी फेरी 20981
नववी फेरी 19296
दहावी फेरी 24908
अकरावी फेरी 24261
बारावी फेरी 16921
तेरावी फेरी 15237
डॉ. नामदेव किरसान (महाविकास आघाडी)
पहिली फेरी 26,920
दुसरी फेरी 25,385
तिसरी फेरी 26,655
चौथी फेरी 27,876
पाचवी फेरी 26,776
सहावी फेरी 27,271
सातवी फेरी 26,427
आठवी फेरी 28,666
नववी फेरी 27,295
दहावी फेरी 26,246
अकरावी फेरी 27,547
बारावी फेरी 28,708
तेरावी फेरी 27,0048