जागतिक जैवविविधता व तंबाखु विरोधी दिनानिमीत्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.6 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जैव-विविधता दिवस व तंबाखु विरोधी दिवस निमित्ताने 30 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय गोंदिया येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सकलेश पिंपळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, जिल्हा सरकारी अभियोक्ता एम.एस.चांदवाणी, तर मार्गदर्शक म्हणून धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र तथा जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. धर्मवीर चौहाण व सर्व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.

         यावेळी प्रा. धर्मवीर चौव्हाण यांनी नैसर्गीक चक्रामधील जैव-विविधता व मानवीय संबंध, मानवाचे अघोरीपणामुळे बदललेले नैसर्गीक चक्र व त्याचे दुष्परिणाम, वर्तमान पिढीला व येणाऱ्या पिढ्यांना दुष्परिणामाचे परिणाम कशाप्रकारे सोसावे लागेल हे शास्त्रीय तथा वैज्ञानिक दुष्टीकोनातून समजावून सांगितले. तसेच वर्तमान काळात जर आपण आज उपाययोजना केले नाही तर नैसर्गीक चक्र पुर्णत: बदललेला दिसेल व हा एकदा बदलला तर मानवीय अस्तीत्व संकटात सापडू शकतो, त्यामुळे निसर्गपुरक मानवीय जीवनमान असायला हवे असे सांगून तंबाखु सेवनामुळे जागतिक सांख्यिकी व केस स्टीच्या माध्यमातून मानवीय जीवनावर होत असलेले दुष्परिणाम व विशेषत: लहान बालकांवर होणारे दुष्परिणाम, त्याचप्रमाणे आज तंबाखु या उद्योगात लहान बालकांचा वापर करण्यात येतो व अशा बालकांचे बालपण हेरावण्याचा दुष्कर्म आजच्या या स्वार्थी जगात मानव करीत आहे. फक्त कागदावर तंबाखुचा विरोध करुन चालणार नाही तर आपल्याला आपल्या सहवासात किंवा अशा क्षेत्रात मुले दिसली तर योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे बालपण बहाल करण्यात आपण आपला मानवीय धर्म निभवायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

         प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक जैव-विविधता व तंबाखु विरोधी दिनानिमीत्त कायदेशीर उपाययोजना या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रिती तुरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. सुचिता लढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी अधीक्षक पी.बी.अनकर, लेखापाल आलेशान मेश्राम, कनिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे, शिपाई बी.डब्ल्यु.पारधी, आर.ए.मेंढे, सरतीमा भगत यांनी मोलाचे सहकार्य केले.