गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य-रेल्वे नागपूर नेतृत्वात मंडळातंर्गत येणार्या रेल्वे स्थानकात तिकीट विक्री, तिकीट तपासणी विशेष अभियान, अस्वच्छता करणार्यांवर कारवाई करण्यासाठी मंडळ रेल्वे प्रबंधकांच्या नेतृत्वात विशेष अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे असले तरी (Gondia railway) रेल्वेने मे महिन्यात फक्त माल वाहतुकीतून १७६.४३ कोटीचे महसूल मिळविले आहे. या अवधीत १.६८ लाख टन माल वाहतुक करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये २९.२३ टक्के तर किराया (माल भाडा) २४.६३ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत २.१३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून तिकीट विक्रीतून (Railway Board) रेल्वेला २६.३८ कोटीची कमाई झाली आहे.
२६.३८ कोटीची तिकीट विक्री
रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यातून रेल्वेच्या उत्पन्नात भर पडत असते. यामध्ये मे महिन्यात नागपूर (Railway Board) रेल्वे मंडळाने चांगली कमाई केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. नागपूर मंडळ अंतर्गत मे महिन्यात माल वाहतूक अंतर्गत १.६८ लाख टन माल वाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला १७६.४३ कोटी रूपयाचा महसूल प्राप्त झाला. तर तिकीट तपासणी अंतर्गत मे-२०२४ मध्ये विना तिकीट प्रवास, अनियमित यात्रा, विना बुकींग माल वाहतूक करणार्या ३६९४५ प्रकरणांची नोंद करून १ कोटी ६६ लाख रूपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धुम्रपानाच्या ४३ प्रकरणी ८६०० रूपये, रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छता करणार्या ५०९ प्रवांशाकडून ५१,५०० दंड वसूल करण्यात आला आहे.
मे महिन्यात २.१३ लाख प्रवांशानी (Railway Board) रेल्वेतून प्रवास केला आहे. यामुळे तिकीट विक्रीतून रेल्वेला २६.३८ कोटी रूपयाची कमाई झाली आहे. पार्विंâग व्यवस्थेतून ३.८८ लाख रूपये व खाद्यपदार्थ विक्रीतून ९.१६ लाख रूपये तर पार्सल लोडिंग अंतर्गत १२६९ टन पार्सल लोडिंग करण्यात आले. यातून रेल्वेला ३६.१७ लाख रूपयाचे महसूल झाले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.