31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हा हिवताप अधिकारी पोहचले मुरकुडोह गावात

किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हा हिवताप अधिकारी पोहचले मुरकुडोह गावात

0
304

blank

गोंदिया,दि.१७ःः सालेकसा तालुक्यातील दरेकसा, गोर्रे, बिजेपार या प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच अतिदुर्गम असलेल्या मुरकुटडोह गावाला भेट देवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य कार्यक्रमाची होत असलेल्या कामाची पाहणी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केली.प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील हिवताप दुषित रुग्णांचा आढावा घेवुन आंतर रुग्ण विभागात  असलेल्या रुग्णाची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन घेतली.गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचार्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहीती जाणुन घेतली.
कीटकजन्य आजार बाबत सालेकसा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी,डॉ.बारई,डॉ.वानवे यांच्या संस्थेतील आरोग्य कर्मचार्यांचे राबविण्यात येत असलेल्या कार्याचे समाधान व्यक्त करुन दररोज होत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण चांगल्या प्रकाराचे करण्याच्या सुचना दिल्या.भेटी दरम्यान त्यांचे सोबत डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.अमित खोडणकर,आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे,आरोग्य सहाय्यक किशोर भालेराव उपस्थित होते.
डॉ.विनोद चव्हाण यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र दरेकसा येथील प्रयोगशाळेत भेट देवुन ताप रुग्णाचे तपासणी होत असलेल्या रक्त नमुन्यांची सुक्ष्मदर्शकाद्वारे तपासणीचे पाहणी केले त्या वेळेस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ललित रहांगडाले व श्रुती उप्पलवार हजर होते. किटकजन्य कार्यक्रमाचे आवश्यक रजिष्टर व रेकॉर्डची पडताळणी केली.तसेच आंतररुग्ण वार्ड,औषधी साठा केंद्र ई.ची पाहणी केली. कार्यक्षेत्रातील गावे हे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने हिवतापाबाबतची साथ उदभवु नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे,कीटकजन्य,जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे,दि.1 ते 31 जुलै दरम्यान डेंगू प्रतिरोध महिना साजरा करुन प्रतिबंधात्मक उपायोजना करणे,गुणवत्तापुर्वक किटकनाशक फवारणी करणे, कार्यक्षेत्रातील 100 टक्के अंडवृद्धी शस्त्रक्रीया होण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय येथे भरती करणे,आश्रमशाळा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आर.डी.के.किट द्वारे रक्त तपासणी करणे,स्थलांरतीत लोकांचे यादी अद्यावत करुन पत्ता सिजन कामावरुन गावी परतलेल्या लोकांचे हिवतापाबाबत तपासणी करणे,हत्तीपाय रोग ग्रेड-3 वरील रुग्णांना अपगंत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे नियोजन करणे,आरोग्य संस्थेत हिवताप बाबतचे रक्त नमुने बँकलॉग ठेवु नये,हिवतापाबाबत गप्पी मासे व लारवा यांचे शाळेत प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रम घेणे ई.विविध बाबी सोबतच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

blank