43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आमदार रहांगडालेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ६३ कोटी मंजूर

आमदार रहांगडालेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ६३ कोटी मंजूर

0
126

blank

तिरोडा,दि.१९:- तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील जनतेसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ अंतर्गत ४०.१७ किमी लांबीच्या रस्त्यांसाठी ६२.७२ कोटी रुपये रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमुळे तिरोडा मतदारसंघातील विविध गावांमध्ये रस्त्यांची सुधारणा होणार आहे, ज्यामुळे नागरिकांची दळवळनाची सोय सुलभ होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. आमदार विजय रहांगडाले यांनी या योजनेतून गावागावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा सिद्धता दिली आहे.या योजनेमुळे तिरोडा मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि स्थानिक विकासाची गती वाढेल अशी अपेक्षा आहे यामध्ये प्रामुख्याने तिरोडा तालुक्यातील तिरोडा बस स्टाप ते मलपुरी रस्ता ४.९४ कि.मी रस्त्याकरिता ८५८.६३ लक्ष, खमारी खडकी ते डोंगरगाव रस्ता ३.७५ कि.मी रस्त्याकरिता ६१४.६६ लक्ष, बोदा सेजगाव रस्ता ३.१५ कि.मी रस्त्याकरिता ४७.६३ लक्ष, सर्रा मारेगाव भजेपार रस्ता ३.४० कि.मी रस्त्याकरिता ४९४.३७ लक्ष, धादरी बेलाटी कवलेवाडा रस्ता ४.७८ कि.मी रस्त्याकरिता ७५८.४५ लक्ष, बरबसपुरा धामनेवाडा रस्ता ५.४७ कि.मी रस्त्याकरिता ८५३.७२ लक्ष, बोदा गोमाटोला रस्ता ४.०२ कि.मी रस्त्याकरिता ५०५.०९ लक्ष, गोरेगाव तालुक्यातील डोंगरुटोला ते पाथरी रस्ता४.१८ कि.मी रस्त्याकरिता ६३६.६५ लक्ष, गोंदिया तालुक्यातील दांडेगाव सहेसपूर कारूटोला रस्ता ६.४८ कि.मी रस्त्याकरिता १०७१.८६ लक्ष या कामांचा समावेश आहे.

blank