26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ गोंदियात चेतना बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन

गोंदियात चेतना बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन

0
133

गोंंदिया,दि.२१– चेतना बहुउदेशीय (NGO)संस्थेच्या गोंदिया जिल्हा शाखेचे उद्घाटन सोहळा येथील शारदा नगर, रिंग रोड, गोंदिया येथे संस्थेचे राज्य सचिव अविनाश गजानन इलमे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी इलमे यांनी गोंदिया जिल्हा कार्यकारीणीची घोषणा केली.यात अध्यक्ष अभय सिंगनगुडे तसेच सचिव पदी गिरीश राणे यांची निवड केली.यावेळी संजय साठवणे,अमोल बालपांडे,राजु ढोमणे,ओमेद्र गजभीये,शक्ती चामट व इतर मान्यवर उपस्थित होते. सामाजिक जनजागृती,शासकीय योजनांची माहीती, उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) व महिला बचत‌गटा मार्फत बनवत असलेल्या प्रक्रिया किंवा उत्पादक वस्तुना चांगली बाजार पेठ मिळवुन देणे,आदिवासी बांधवांसाठी काम करणे, स्किल डेव्हलपमेंट, ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर राबवणे, इत्यादी अशा विविध विषयांवर  संस्था गोंदियात काम करणार आहे.अभय सिंगनजुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.