25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ ईटियाडोह धरण,व नवेगावबांध जलाशय ओव्हरप्लो होण्याचे मार्गावर

ईटियाडोह धरण,व नवेगावबांध जलाशय ओव्हरप्लो होण्याचे मार्गावर

0
1415

अर्जुनी मोर.(सुरेंद्रकुमार ठवरे)-गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसाने जोर पकडला आहे. नदी नाले ओसंडुन वाहात आहेत.अर्जुनी मोर.तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे तलाव बोड्या तुडुंब भरत आहेत.तर तालुक्याचे भुषण असलेले ईटियाडोह धरण व नवेगावबांध जलाशयात पाण्याचा साठा वाढत असल्याने लवकरच ही दोन्ही जलाशये ओव्हरफ्लो होण्याचे मार्गावर आहेत.
तालुक्यातील ईटियाडोह धरण आज दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 78.42 % भरलेला आहे.दर तासांनी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.ईटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातुन आवागमन करणा-या सर्व सबंधितांनी स्वत:ची काळजी घ्यावी.असा सतर्कतेचा ईशारा प्रशासनाचे वतीने देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे नवेगावबांध जलाशयात सुध्दा पाण्याची पातळी वाढत असल्याने हा जलाशय सुध्दा ओव्हरफ्लो होण्याचे मार्गावर आहे.