▪️आषाढी गुरू पौर्णिमेनिमित्त शासकीय विश्राम गृह येथे आयोजित बैठकित निर्णय
गोंदिया:- भारतीय संविधानाचे गौरवशाली 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव “हर घर संविधान” जागृती अभियान जिल्हास्तरावर राबविण्यासाठी उपक्रम आयोजन नियोजन संबंधी चर्चा बैठक आषाढी गुर पौर्णिमेच्या दिवशी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली. या प्रसंगी “भारतीय संविधानाच्या गौरवशाली 75व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेला आहे. परंतु आजही जनमाणसात संविधान विषयक लोकतांत्रिक जागृती नसल्यामुळे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव साजरे करताना या प्रसंगी चर्चा चिंतन व जमिनिस्तरावर प्रचार प्रसार कृती आवश्यक आहे. असे प्रतिपादन संविधान जागृती अभियान समन्वयक प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी केले.
संविधान मैत्री संघ व सर्वसामाजिक मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती अभियानाला अधिक तेज गती प्रदान करून गोंदिया जिल्ह्यात 8 ही तालुक्यात घरों घरी जनमानसात संविधान संस्कृती कशा सोप्या व सध्या पद्धतीने रुजवू शकतो यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम नियोजन आयोजन स्वरूप संबंधी सल्ला विचार आमंत्रित करण्यासाठी सार्वजनिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांच्या सहमतीने हर घर संविधान जागृती अभियान जिल्ह्यात दोन टप्प्यात राबविण्याचे ठरले, पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्ट ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येईल. या पहिल्या टप्प्यात “संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024ला करण्यात येणार आहे. 01 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर हा काळ शालेय परीक्षा, सण उत्सव सुट्ट्या व निवडणुकीचा काळ राहणार असल्याने 29 सप्टेंबर 2024 ही सर्वाँना सोयीस्कर असणारी तारीख ठविण्यात आली. 18 वर्षाच्या आतील ज्युनिअर व 18 वर्षांवरील सिनियर या दोन गटात आयोजित या परीक्षेत 1.5 (दीड) लाखाचे 50 नगद व 50 प्रोत्साहन बक्षिसं स्मृती चिन्ह, प्रमाणपत्रासह जिल्ह्यातील 8 तालुक्यात समान स्वरूपात प्रदान करण्यात येईल.
विद्यार्थ्यांसमवेत पालक, शिक्षक वर्ग यांनी समजून घेण्यासाठी परिक्षेकरीता आवश्यक अनुच्छेद भाग विषयसह संविधान प्रास्तविका अर्थ, मूलभूत हक्क व मुलभुत कर्तव्य, महिला व बालकांचे हक्क कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदे, जनगणना, भारतीय निवडणूक प्रणाली या संबंधीचे विषय राहणार आहेत.
या बैठक प्रसंगी संविधान जागृती अभियान समन्वयक प्रा. डॉ दिशा गेडाम, मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष घनश्याम पटले, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसियेशन (विज्युक्टा) चे अध्यक्ष प्रा.पोमेंद्र कटरे, प्राचार्य रोमेंद्र बोरकर, आदेश गणवीर, अनिल गोंडाणे, मनोजकुमार बनसोड, केशवराव देशमुख, विद्यार्थिनी हंसा बावनकर, या रश्मी येसनसुरे, स्नेहा मेश्राम, श्रुती ठाकरे, गुंजन काढेवार, नीलाक्षी हिरापुरे, आराधना उके, जान्हवी भोंडेकर, पंचशिला पानतावणे, अतुल सतदेवे व इतर संविधान मित्र प्रामुख्याने उपस्थित होते.
आषाढी गुरू पौर्णिमा निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी गुरू जणांना लेखणी पुष्प भेटस्वरुप देऊन आशीर्वाद घेतला. बैठकीचे संचालन संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे तर उपस्थितांचे आभार सहसंयोजक आदेश गणवीर यांनी मानले.





