सर्वर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी पिक विम्यापासुन वंचित

0
53

दोन दिवस वाढवून दिले होते मुदतवाढ

पुन्हा मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी

गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदतीच्या स्वरूपात भरपाई मिळावी म्हणून काढल्या जात असलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या नोंदणीसाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती. पण सर्व्हर डाऊन झाल्याने शेवटच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांना योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.

जेमतेम 1 रुपयात विमा काढण्याची सोय शासनाने केली आहे. शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. ही योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत अनेक शेतकरी विमा काढण्यास उत्सुक नव्हते. मात्र अवघ्या एक रुपयात विम्याचे संरक्षण मिळत असल्याने शेतकऱ्यांना तेवढाच आधार राहणार असल्याने बरेच शेतकरी पिक विमा काढण्यासाठी सरसावले आहेत.