अर्जुनी/मोरगाव – तालुक्याच्या गोठणगाव (तिबेट कैंम्प) येथील युनियन बैंक ऑफ इंडिया शाखेत परिसरातील 32 शेतकऱ्यांचे कृषि कर्जाचे प्रकरण अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती बैंकेकडुन मिळाली आहे.शाखा व्यवस्थापक ईशांत बडोले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नवे आलेले शाखा व्यवस्थापक श्री.रामटेके यांनी शेतकऱ्यांचे कृषि कर्जाचे प्रकरण निकाली काढायला पाहिजे होते.परंतु कामचुकार शाखा व्यवस्थापकामुळे यांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.आधीच अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांचे कृषि कर्ज त्वरीत निकाली काढण्याची मागणी होत आहे.मागील 2023 वर्षीच्या जुन महिन्यात आलेले शाखा व्यवस्थापक ईशांत बडोले हे कार्यतत्पर बैंक अधिकारी म्हणुन या भागात ओळख आहे.ते प्रथम शेतकऱ्यांच्या कामाला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढायचे. परंतु त्यांची जुलै 2024 मध्ये बदली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यामुळे शेतकऱ्यांनी बैंक प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला आहे.तर हल्ली असलेले शाखा व्यवस्थापक श्री.रामटेके हे बैंकेच्या वेळेत हजर राहत नाहीत त्यामुळे बैंकेच्या स्थळापासुन 30-35 किलो मीटर अंतरावर असलेल्या राजोली, भरनोली,तिरखुरी आणि ईतर गावच्या बैंक ग्राहकांवरती आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी दखल घेऊन नागरिकांच्या वतीने त्यांनी युनियन बैंकेचे शाखा व्यवस्थापक रामटेके यांना त्वरीत हटवुन मागील शाखा व्यवस्थापक असलेले बडोले यांची झालेली बदली रद्द करुन त्यांना गोठणगाव (तिबेट कैंम्प) येथील युनियन बैंक ऑफ इंडिया शाखेत नियुक्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तर बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांच्या वतीने केशोरी जि प क्षेत्राचे जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी दिला आहे.त्यामुळे बैंक प्रशासन याबाबद काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.