माजी आमदार राजेंन्द्रजी जैन या़च्या वाढदिवसानिमित्त
गरुजू महिलाना 151 साड्याचे वाटप
गोंदिया – गोंदिया शिक्षण संस्था चे सचिव माजी आमदार राजेंन्द्रजी जैन यांच्या वाढदिवसानिमीत्त एन.एम.डी महाविद्यालयातील राष्ट्रिय सेवा योजना युनिटच्या माध्यमातून गोंदिया शिक्षण संस्थेत कार्यरत रोजदार महिला कर्मचारी यांना राजेन्द्र जैन यांच्या हस्ते साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले. तर रासेयो स्वंयसेवकांनी शहरातील गरजू महिलांना151साड्याचे वाटप करुन सन्मान केला.संचालक निखिल जैन व महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रिय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाँ.बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात रोजदार महिला कर्मचारी व शहरातील गरजू महिलांना साड्याचे वाटप करुन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी एन.एम.डी महाविद्यालय,डि.बी सायन्स महाविद्यालय,एस.एस. महिला महाविद्यालयातील रोजदार महिला कर्मचारी यांचा सहभाग होता.त्यांनतर बस स्टाँप,रेल्वे स्टेशन व रिंगरोड परीसरातील रोजगारी चे काम करणारे महिलाना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाँ.बबन मेश्राम,प्रा.रविकुमार रहागडाले,अनिल मेंढे सह रासेयो स्वंयसेवक यांनी साड्याचे वाटप करुन सन्मान केला.कार्यक्रमाचे यशस्वीते करीता हर्षा बावनकर,गायत्री बनकर,सुहानी ठाकरे,दिलेश चुटे,उज्वला शहारे,हिना लांजेवार,आर्या चव्हाण,राधा ठाकरे,विनय मेढे,दिप्पतेश फुकटकर,रोशन कु़भलकर,मोहित रिनाईत,सागर सुर्यवंशी,प्रणाली बन्सोड,असप्रिया पठाण,त्रिष्णा भुजाडे,जया तांडेकर,अमित बडोले,झामसिंग बघेले व रासेयो स्वयंस्वेक, प्राध्यापक वर्ग, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.