नागपुरात विदर्भवादी झाले आक्रमक; प्रकाश पोहरे ताब्यात

0
135

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या हाकेवर निघालेला भव्य मोर्चा पोलिसांनी गोवारी टी पॉइंटवर रोखला आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.गोंदिया जिल्ह्यातून असंख्य लोक पोहोचलेले होते. वसंत गवळी जी श्री चव्हाण,अतुल सतदेवे,अर्जुनी मोरगावचे विदर्भ राज्य विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाप्रमुख दादा फुडे, रेशीम कापगते, संपत काठाने ,श्रावणजी मेंढे ,कृष्णा नाकाडे इत्यादी कार्यकर्ते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर येथे यशवंत स्टेडियम पासून झालेल्या आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलक शांततेत विधानसभेच्या दिशेने जाण्यास परवानगी देण्याची मागणी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. दरम्यान, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्यासह काही विदर्भवादी नेते आणि आंदोलकांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले आहे.या मोर्चाच्या नेतृत्व दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ पोहरे ,माजी आमदार वामनराव चटप,अनिल केदार, मामुर्डे ताई, सभापती काटोल सुधा ताई पावडे, तसेच भंडारा, गडचिरोली अमरावती वर्धा चंद्रपूर ब्रह्मपुरी या ठिकाणी अनेक तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते व विदर्भवादी आपल्या संख्येने कधी नव्हे इतक्या जोराने येऊन या सरकारला उलटवून पाडायचं जोपर्यंत आपला विदर्भ देत नाही तोपर्यंत या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहायचं नाही अशा इराद्याने हजारो लोकांनी आपल्याला स्वतःला अटक करून घेतली आणि मुख्यालयात सभा घेण्यात आली इत्यादी बरेच मान्यवर उपस्थित होते.