गोंदिया,दि.१० :- महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिने राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून रक्षाबंधन सणापुर्वी राज्य सरकारकडुन जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. याची पुर्ण खात्री आहे. म्हणन कोणत्याही शंका-कुशंका महिला भगीनींना बाळगण्याची गरज नाही असे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दी पत्राच्या माध्यमातून सांगितले आहे.
ज्या महिलांनी अर्ज केले नाही, त्यांनी अर्ज करावे तर ज्या महिलांचे काही कारणास्तव अर्ज नामंजूर झालेत, या संदर्भात आम्ही राज्य सरकारला जिल्यातील ऑॉफलाईन आणि ऑनलाईन अजाची जाणकारी दिली आहे.विशेष म्हणजे ज्या अजामध्ये त्रुटी आहे असे अर्ज त्यंनी त्रृ्या पर्ण करून अर्ज सादर करावे, त्या अर्जाना तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश स्थानिक समितींना दिले आहेत. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आश्वास्त केल्याचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले आहहे.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल पुढे म्हणाले, राज्याच्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाचे दृष्टीकोनातून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना खन्या अरथाने महत्वाकांक्षी योजना ठरणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, या योजनेमुळे महिलांमध्ये देखील आशा पल्लवित झाल्या असून उत्साह दिसून येत आहे.
यांसदर्भात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी यंत्रणेकड़ुन माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आजपावेतो २ लाख ८८ हजार ७७३ महिलांनी अर्ज केले आहे, त्यातील २ लाख ८० हजार २५१ अर्ज मंजूर झाले आहेत, तर ५४८६ अर्ज काही त्रूट्यांमुळे तात्प्रता नामंजूर झाले आहेत.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योजने आणि नामांजूर झालेले आवेदन आणि ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रक्रियेत येणान्या अडी-अडचणी बाबतही माहिती देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३ हजार रूपये अर्थसहाय्य रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यात जमा हाईल. त्यामुळे ज्या लाभाध्यानी अर्ज केले नाही, त्यांनी लवकरात-लवकर अर्ज करावे, आणि ज्यांचे अर्ज काही त्रूट्यामुळे नामंजूर झाले आहेत, त्या त्रृट्यांचीपूर्ता करून घ्यावी, निश्चितपणे योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळणार, अशी ग्वाही माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.