गोंदिया,दि.१० :महिलांच्या सक्षमीकरणाचे उदात्त हेतु लक्षात घेवून राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून रक्षाबंधन सणापुर्वी राज्य सरकारकडून जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.यात कसलीही शंका-कुशंका बाळगण्याची गरज नाही. ज्या महिलांनी अर्ज केले नाही, त्यांनी अर्ज करावे तर ज्या महिलांचे काही कारणास्तव अर्ज नामंजूर झालेत, या संदर्भात राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व खा.प्रफुल पटेल यांचा सोबत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी चर्चा करून जिल्यातील ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्जांची माहिती दिली.
विशेष म्हणजे ज्या अर्जामध्ये त्रुटी आहे असे अर्ज त्यांनी त्रृट्या पूर्ण करून अर्ज सादर करावे, त्या अर्जाना तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश स्थानिक समितींना दिल्याचे उपमुख्यमंंत्री पवार यांनी आश्वस्त केल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.
माजी आमदार जैन पुढे म्हणाले, राज्याच्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाचे दृष्टीकोनातून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना खर्या अर्थाने महत्वाकांक्षी योजना ठरणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये देखील आशा पल्लवित झाल्या असून उत्साह दिसून येत आहे. यांसदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यंत्रणेकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आजपावेतो २ लाख ८८ हजार ७७३ महिलांनी अर्ज केले आहे. त्यातील २ लाख ८० हजार २५१ अर्ज मंजूर झाले आहेत. तर ५४८६ अर्ज काही त्रृट्यांमुळे नामंजूर आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व खा.प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा करून योजनेची माहिती दिली आहे. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रक्रियेत येणार्या अडी-अडचणीबाबतही माहिती देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३ हजार रूपये अर्थसहाय्य रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले नाही. त्यांनी अर्ज करावे, ज्यांचे अर्ज काही त्रृट्यामुळे नामंजूर झाले आहेत. त्या त्रृट्यांची पुर्तता करून घ्यावी, निश्चितपणे योजनेचा लाभ महिलांना मिळणार, अशी ग्वाही देखील दिली. गोंदिया जिल्हृयाच्या समितीमध्ये राष्ट्रवादीचे विनित शहारे व किर्ती पटले हे दोन सदस्य आहेत. निश्चितपणे या दोन्ही सदस्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आपले ध्येय आहे. महिलांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.