अपघातानंतर राणी अवंतीबाई चौकात नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन

0
1681
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.१२ः शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात आज १२ आँगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रत्यक्षदर्शी ने सांगितलेल्या माहितीनुसार सदर भरधाव ट्रक ने महिला शिक्षिकेला काही अंतरापर्यंत चिरडत नेले यात शिक्षिकेच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अल्विना जेम्स लुईस वय ३१ हल्ली मुक्काम अरिहंत कॉलोनी कुडवा,गोंदिया असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.ही शिक्षिका गोंदिया येथून अंभोरा येथील खासगी शाळेमध्ये जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी तिरोडा कडून बालाघाट टी पॉईंट कडे जात असताना अवंतीबाई चौक या ठिकाणी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने शिक्षकेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर तणाव वाढत असताना मात्र रामनगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत ट्रक व चालकाला ताब्यात घेतले.

सदर चौक परिसरात गेल्या चार पाच महिन्यात ६-७ अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवून गतिरोधक तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु याकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले.त्यातच आज सोमवारला झालेल्या अपघातामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे व शिंदे शिवसेना गटाचे नेते जितेंंद्र बावनकर यांच्या नेतृत्वात परिसरातील नागिरकांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्याकरीता रास्तारोको आंदोलन केल्याने तिरोडा-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळाकरीता विस्कळीत झाली होती.उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बनकर,वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक नागेश भाष्कर यांनी आंदोलकाची समजूत काढल्यानंंतर रस्ता वाहतुकीकरीता मोकळा करण्यात आला.

 या मार्गावर मोठ्याप्रमाणात तथाकथीत नेत्यांचे अनधिकृत होर्डींग लागले असून या होर्डींगमुळे दुसरीकडून येणारे दिसून येत नाही.त्यातच सहयोग हाॅस्पीटलच्या बाजूने असलेल्या भागातील दुकानासमोर मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेऊन अर्धा रस्ता व्यापला जातो,त्यामुळे सुध्दा रहदारीला त्रास होत असतो.गेल्या काही दिवसापुर्वीच शरद पवार राष्ट्रवादी गटाने रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतुक विभागाला निवेदन दिले होते,त्यानंतरही विभागाला जाग आली नाही आज त्या परिसरात भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याने नागरिकांत मोठा असंतोष दिसून येत आहे.

अवैध होर्डींगमुळे राणी अवंतीबाई चौकात ट्रकच्या चाकात येऊन महिलेचा मृत्यू