राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अर्जुनी मोर.-आपला परिसर हा अति संवेदनशील, मात्र पालकमंत्री म्हणून आपल्या हातून अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून बऱ्याच सुविधा तालुक्यात उपलब्धही झाले आहेत. पण आरोग्य सुविधेसाठी परिसरातील रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेर पडावे लागते. आपण बघतो की, ब्रम्हपुरी गोंदिया नागपूर हे मेडिकल हब तयार झाले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी गोर गरिबांना लुटण्याचा प्रयत्न होत आहे. अनेकांना आपल्याला आरोग्य योजनांबाबत कल्पना नसते. बऱ्याच शस्त्रक्रिया उपचार हे मोफत तर अतिशय कमी पैशात होतात मात्र त्यावेळी आपल्या अज्ञाना अभावी लूट होत असते. त्यामुळे गोर गरीब व सर्व सामान्य रुग्णांना आरोग्य विषय सल्ला मदत व गरजू रुग्णांना मदतीचा हात देत रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून गंगा बाई मल्टिस्पेशीयलीटी हाॅस्पीटल व आशा हाॅस्पीटल व .फाउंडेशनच्या मदतीने आपण रुग्ण आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून यापुढे आपण काम करू,आणी अशा निशु:ल्क आरोग्य शिबीरातुन गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
राजकुमार बडोले फाऊंडेशन तर्फे ताडगाव,लाखांदूर रोडवर अर्जुनी मोर येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन ता.१६ रोजी सकाळी ९ ते १ या दरम्यान करण्यात आले होते..या आरोग्य शिबीरासाठी मेडीकल कॉलेज नागपूर, मेडीकल कॉलेज गोंदिया,आशा हाॅस्पीटल नागपूर,आशा नर्सिंग कॉलेज कामठी,व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाशी संबंधित नागपूर व गोंदिया येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते.
आयोजित शिबिराला जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर, शारदा बडोले, डॉ. संजय गाडे, डॉ. देवेंद्र गनविर, तालुकाध्यक्ष विजय कापगते, प्रकाश गहाणे, रामदास कोहाडकर, मुकेश जायस्वाल, डॉ.गजानन डोंगरवार, डॉ.नाजूक कुंभरे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर , ममता भैय्या, सपना उपवंशी, रामचंद्र देशमुख,पं.स.सदस्य नूतन सोनवाने, व्यकंट खोब्रागडे,पं.स.सदस्य शालिनी डोंगरवार, सरपंच मिना शहारे, इंदुबाई लांजेवार, संध्या शहारे, ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबीराचे आयोजन राजकुमार बडोले फाऊंडेशनचे राकेश भास्कर, प्रशांत शहारे,उमेश पंधरे, प्रशांत उके,अमीत हुमणे व भाजपचे ,भोजु लोगडे,येसकुमार शहारे, जितेंद्र साळवे, संतोष राठी, जयंत लांजेवार, संजय खरवडे,सुदाम कोवे, संजय बिस्वास ईत्यादींनी केले.शिबीराचे संचालन राजहंस ढोके व अमीत हुमने यांनी केले. व आभार प्रदर्शन लैलेश शिवनकर यांनी केले. या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, हड्डी रोग, कांन नाक घसा, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग, मानसिक रोग ई विविध आजारसंबधी २०८७ रुग्णांची तपासणी करून निदान उपचार करून घेण्यात आले.
आरोग्य विमा काढा…..
“.ग्रामीण भागातील जनता अत्याधुनिक वैद्यकीय सेवेपासून वंचित आहे.तसेच ग्रामीण रुग्णांना खाजगी व महागड्या वैद्यकीय उपचारासाठी शहरात धाव घ्यावी लागते ९० टक्के आकस्मित दुर्घटना आपल्या आजूबाजूला घडतात. अशा दुर्घटना झाल्यास गबबड होते आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. त्यामुळे सर्वांनी आरोग्य विमा काढणे आवश्यक आहे. आपल्याकडे बरेच लोक त्याबाबत उदासीन राहतात. ती गंभीर वेळ हाताळण्यासाठी जीवनात मदतीचा मूलभूत उपाय म्हणून आणि गरजू रुग्णांना आकस्मिक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विमा सर्वांनी घेण्याची गरज आहे. ते सर्वांनी काढण्याचे आवाहन राजकुमार बडोले यांनी केले.