नागपूर, दि 19 ऑगस्ट:- महावितरणच्या भरारी पथकांनी विदर्भात मोठ्या प्रमाणावर वीज चोरट्यांना रंगेहात पकडले आहे. एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्यांत 3459 ग्राहकांची तपासणी करून 1019 जणांची प्रत्यक्ष वीजचोरी पकडण्यात आली आहे. यातून 6 कोटी 72 लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. याशिवाय, 5 कोटी 92 लाख रुपयांची अनियमित वीज वापराची 732 प्रकरणेही उघडकीस आणण्यात भरारी पथकाला यश मिलाले आहे.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कार्यरत भरारी पथकांनी एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या काळात विद्युत कायदा 2003 सुधारीत 2007 कलम 135 अन्वये कारवाई करून 1019 ग्राहकांकडील तब्बल 6 कोटी 72 लाख रुपयांच्या प्रत्यक्ष विजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. तसेच विद्युत कायदा 2003 कलम 126 अन्वये व इतर 732 प्रकरणां मध्ये 5 कोटी 92 लाख रुपयांची वीज वापरातील अनियमितता उघडकीस आणली. या चार महिन्याच्या काळात या वीज चोरीच्या आणि वीज वापरातील अनियमिततएपोटी एकूण 12 कोटी 64 लाख रुपयांच्या रकमेचे निर्धारण करून त्यापैकी 10 कोटी 49 लाखाची रक्कम संबंधीत ग्राहकांकडून वसूल करण्यात आली असून विजचोरीची रक्कम न भरलेल्या ग्राहकांविरुध्द विविध पोलीस ठाण्यात तब्बल 114 विज ग्राहकांवर विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महावितरनच्य अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांच्या यशस्वी मार्गदर्शनात महावितरण ग्राहकांना अखंडीत विज पुरवठा देण्यास सातत्याने कार्यरत आहे. परंतु विज वितरण हानी व विजचोरी यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. सदरचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व वीज हानी कमी करण्यासाठी कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) विनायक नरळे (म.पो.से). यांच्या नेतृत्वात कंपनीमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभाग अवीरतपणे कार्यरत आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या अधिपत्याखाली नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) यांच्या अखत्यारित नागपूर विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर 12 भरारी पथके व विभागीय स्तवरावर 3 भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यालय कार्यरत आहे.
नागरिकांना आवाहन :-
नागरिकांनी आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकांना द्यावी. अशी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनिल थापेकर यांनी दिली आहे. विजचोरीमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील असून नागरिकांनी अधिकृतपणे वीज पुरवठा घेवून महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन देखील सुनिल थापेकर यांनी केले आहे.