अर्जुनी मोरगांव -तालुक्यातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खांबीच्या वतीने दि.२० ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड व संवर्धन या मोहिमेर्तंगत खांबी येथील मळेघाटबाबा देवस्थान पहाडी परीसरात वृक्ष लागवड करण्यात आले.वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने व्यापक अशा मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खांबी यांच्या वतीने खांबी येथील मळेघाटबाबा देवस्थान पहाडी परिसरामध्ये जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर व पं.स.सदस्य संदिप कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी १५० प्रजातीचे रोपटे, सिड बाॅल १७५ व १०००० विविध प्रकारचे बिज लावण्यात आले. याप्रसंगी पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियंका खोटेले, उपाध्यक्ष राकेश कोसरे, ग्रा. पं. सदस्य शुभम बहेकार, माजी सरपंच प्रकाश शिवणकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष भगवान मेंढे, ग्रा पं. संगणक ऑपरेटर योगेश लोणारे, घनश्याम लोणारे, प्रशांत खोटेले, विष्णू डोये व जि. प. शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक भद्रावती काळसर्पे, सहाय्यक शिक्षक नागपुरे, शिक्षक अरविंद ऊके तसेच प्रामुख्याने काही विद्यार्थी उपस्थित होते.