सडक अर्जुनी,दि.२८:--तालुक्यातील सौंदड येथील लाल गोदाम येथे जाणारा रस्ता ५ वर्षापासून खड्ड्यात रस्ता की रस्ता खड्ड्यात अशी अवस्था झाली आहे.सौंदड बसस्थानकावरून ८०० मी.लांब रेल्वे स्थानक व लाल गोदाम जाणा-या रस्त्यावरून प्रवास करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.विशेष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून सौंदड येथील लाल गोदाम हे शासकीय अन्नधान्य साठवणूकीसाठी वापरले जाते.दररोज या रस्त्याने तालुक्यातील संपूर्ण स्वस्त धान्य दुकानात दिला जाणारा राशनचे धान्य याच गोदामातून वितरीत केला जातो.तसेच शासकीय खरेदीचे अन्नधान्याचे ओव्हरलोड ट्रकने रोजच माल आणले जाते.पण मागिल ५ वर्षापूर्वी तयार केलेला डांबरीकरण रस्त्याची रिपेरींग न केल्यामुळे खड्डे व चिखलाचे साम्राज्य झाले आहे. या रस्त्याने जाणारे नागरिक यांना ये-जा करतांना चिखलमय रस्त्यातून वाट काढून जात आहेत.राज्य शासनामध्ये काही लोकप्रतिनिधी अंगावर घालणा-या कपड्याचा व गाड्यांचा तसेच गाडीवर लावल्या जाणा-या झेंड्याचा रंग बदलत आहेत. तसे या गोदामाला जाणा-या रस्त्याचे रंग बदलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शासन व लोकप्रतिनिधी गाव तिथे रस्ता व पांदन रस्ते यांचेहसिमेटीकरण करत आहे.पण या गोदामाला व रेल्वे स्थानकावर जाणारा रस्ता नेहमी वर्दळीचा असूनसुद्धा याकडे संबंधित महसुल व सार्वजनिक बांधकाम यांनी दुर्लक्ष केले आहे.या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होत असतात .पण एक-एक फुट चिखलमय रस्ता असल्याने दुचाकी चालक यांचे सुद्धा चिखलाने रंग बदलले जात आहे.
लाल गोदामला जाणारा रस्ता चिखलमय,बाधकाम व महसुल विभागाचे दुर्लक्ष
वाढदिवसाच्या शुभेच्छा