नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कार्यभार स्वीकारला

0
7330

भंडारा दि. 5 सप्टेंबर- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून आज सकाळी स्वीकारला.डॉ. संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्पूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजना मुख्यालय नागपूरयेथे आयुक्त म्हणून  काम केले आहे.

 डॉ. कोलते यांना निवासी उपजिल्हाधिकारी धुळे पदावर कार्यरत असताना जनगणनेविषयक उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले आहे. तसेच उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना पोषण अभियान 2018 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहे. 1994 मध्ये राज्य प्रशासकीय सेवेद्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जळगावनाशिकधुळेमुंबईपुणे येथे विविध पदांवर काम केले. त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.