मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करा;योजनादूतांना मिळणार दहा हजार मानधन

0
147

गोंदिया,दि. 9: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचयातीसाठी एक शहरी भागात 5 हजार लोकसंख्येमागे एक योजनादूताची निवड करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात 668 योजनादूत नेमल्या जाणार आहेत. याउपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी,.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे.

पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत :- या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवार हा 18 ते 35 वयोगटातील असावा उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. उमेदवारांकडे स्मार्ट फोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा दाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र, इत्यादी अधिवासाचा दाखला, उमेदवारांक आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छूक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.