32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ खरंच सॅल्यूट… भर पावसात ‘कर्तव्यदक्ष’ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

खरंच सॅल्यूट… भर पावसात ‘कर्तव्यदक्ष’ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

0
422

blank

खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.१४ः येथील जयस्तंभ चौकात वाहतूक पोलीस भर पावसात वाहतूक नियमन करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.गोंदिया शहर वाहतूक विभागाचे शिपाई प्रवीण वाढिवे यांचा हा व्हिडीओ आहे.शुक्रवारच्या (दि.१३)सायकांळच्या सुुमारास पावसामध्ये उभं राहून वाहतूक नियमन केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


गोंदियात काल सर्कस मैदान येथे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.दरम्यान,काल कार्यक्रम संपल्यानंतर नेमकं त्याचवेळी जोरदार पाऊस बरसला.जोरदार पाऊस कोसळल्याने गोंदियाकरांची चांगलीच गोची झाली.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसातही ट्राफिक जामची समस्या निर्माण होऊ नये म्हणून भरपावसात वाहतूक प्रवीण वाढिवे यांनी आपल्या सहकारी कर्मचारी मित्रासह कर्तव्य बजावले. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

blank