वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोरेगाव, दि. 15 : तालुक्यातील कलपाथऱी येथील बंसतराव ढोरे हे १३ सप्टेबंरला शेतात गेले असता रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.दरम्यान १४ सप्टेबंरला सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी जंगलामध्ये शोध घेत असताना वनविकास महामंडळाच्या जांभळी १ वनपरीक्षेत्रातील कक्ष क्र.४२० आरएफ मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी,पोलीस तसेच सेवा संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता शेतकरी बसंतराव ढोरे(वय ४४) यांचा मृतदेह आढळून आला.