गृहराज्यमंत्री अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

0
7

चंद्रपूर,दि.08-केंद्रीय गृहराज्यमंत्री व चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार ना.हसंराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरकडे येत असतांना आज सकाळी 10 च्या सुमारास मोरवा नजीक त्यांच्या वाहनातील सुरक्षा रक्षकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली.विशेष म्हणजे काही वेळापुर्वीच अहीर हे त्या गाडीतून उतरुन दुसर्या गाडीत बसले होते.जखमींना उपचारासाठूी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ना.अहीर सुरक्षित असून वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे.