शौषखड्यात पडून तीनवर्षीय बालकाचा मृत्यू

0
21

देवरी,दि.08- तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाèया कोटजांभोरा ग्रामपंचायतीच्या देवलगाव येथे गुरुवारला दुपारी ३ वाजेच्या सुमारास हातपंपाचे पाणी साचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शोषखड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत मूलाचे नाव मितेश कैलास अंबादे (वय ३) असे आहे.हा मुलगा घराशेजारी असलेल्या हातपंपाजवळ खेळत असतांंनाच हातपंपाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने खोदण्यात आलेल्या पाण्याच्या शोषखड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला.88d49128-38f8-40b4-ae92-fc43df829857या शोषखड्याला झाकूण न ठेवण्यात आल्यानेच ही घटना घडली.जेव्हा की गावातील नागरिकांनी सरपंच नुतन भातखेडे व ग्रा.प.सदस्यांना त्या खड्यावर झाकण लावण्याची विनंती केली होती.परंतु त्यांनी लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याने सरपंच नुतन भातखेडे,ग्रा.प.सदस्य विरेंद्र वतेकार व श्रध्दाजंली वालदे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी देवलगाववासियांनी केली आहे.