
आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे आवाहन
गोंदिया : संविधानिक आदिवासी गोंडगोवारी जमातीचे प्रलंबित मागण्या व न्यायासाठी जमातीच्या वतीने नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात २१ सप्टेंबर २०२४ पासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. या आंदोलनानुसार २७ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील गोंडगोवारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जिल्हा संयोजक सुशिल राऊत यांनी केले आहे.
राज्य शासन आदिवासी गोंड गोवारी त्यांना संवैधानिक हक्कापासून सतत वंचित ठेवत आहे. यासाठी समाजाकडून अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. परंतु, शासन न्याय देण्याऐवजी चालढकल करून सतत कुरघोडी करीत आहे. अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या न्या.वडणे समितीची मुदत संपूर्ण सकारात्मक अहवाल सादर करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे राज्य शासनाच्या जात पडताळणी समित्या भ्रष्टवृत्तीने काम करीत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गोंड गोवारी समाज आरपारचा भुमिकेत आला आहे. जमातीच्या वतीने नागपूर येथे आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात २१ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनातंर्गत २७ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील गोंड गोवारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जिल्हा संयोजक सुशिल राऊत यांनी केले आहे.
………………..
रेल्वे प्रबंधकांना निवेदन
नागपूर येथे २७ सप्टेंबर रोजी आयोजित भव्य मोर्चा व जेल भरो आंदोलनात जिल्ह्यातील गोंड गोवारी बांधव सहभाग होणार आहेत. त्यामुळे ते सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वेगाड्यांनी प्रवास करणार. याकरीता रेल्वे प्रशासनाने सहकार्य करून समाजाच्या लोकांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जिल्हा संयोजक तथा जिल्हाध्यक्ष सुशिल राऊत यांनी केली आहे. या संदर्भात प्रधान प्रबंधक, पोलिस निरीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आले आहे.
००००००