गोंदिया,दि.०५-जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रीत्सोव सुरु आहे.माता राणीच्या दर्शनासाठी भाविक भक्त गण मंदीरात जावुन मनोभावनेने पुजा अर्चना करत आहे.गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी येथे सुर्यादेव मांडोदेवी संस्थानच्या मार्फत नवरात्रीत्सोव मंडळांकडून उत्सवाच्या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातात.हजारो भाविक मांडोदेवी येथे भेटी देत असतात. लोकांना त्या ठिकाणी आरोग्य विषयक अडचणी उदभवु नये दरवर्षी प्रमाणे आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव व्दारे गरजू यात्रेकरू रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातुन आरोग्य शिबीर लावण्यात आलेले आहे.लोकांना आवश्यक प्रथमोपचार,साथरोग जलजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत ओटी तपासणी करून पाणी स्त्रोतांचे व उपहारगृहाचे पाणी साठ्याचे क्लोरीनेशन कऱण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपचारासोबतच जनजागृती स्टॉलच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक योजना जसे प्रधानमंत्री मातृवंदन योजना,जननी सुरक्षा कार्यक्रम,जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आभा कार्ड,मानव विकास कार्यक्रम यासोबत आरोग्य विषयक विविध आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपचार यांचे सुद्धा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.आरोग्य कँम्प मधुन आयुष ,योगा, मानसिक आजार,सिकलसेल व असासंर्गिक आजारा जसे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार,कि
दि.4 ऑक्टोबर रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्र आमदार विनोद अग्रवाल यांनी सुर्यादेव मांडोदेवी संस्थान येथे भेट देवुन दर्शन घेतले.मा.आमदार महोदयांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र तिगावं आरोग्य शिबीर येथे भेट देवुन स्वतः आरोग्य विषयक कार्यक्रम व योजनांची जनजागृती केली व देण्यात येणारे सेवा बाबत कौतुक करून समाधान व्यक्त केले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव चे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रेमकुमार बघेले, डॉ.रूपल बिसेन,सामुदायिक आरोग्य अधिकारी मयुरी शिवणकर,आरोग्य सहायिका गोखले, औषध निर्माण अधिकारी अंजू कांबळे, आरोग्य सेवक राणे, आशा ताई कोपिटोला हे उपस्थित होते.