बळीप्रतिपदेच्या निमित्ताने गोंदियात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा

0
257

गोंदिया : दरवर्षी शहरातील सर्व पुरोगामी पक्ष-संघटना ‘बळीराजा महोत्सवन’बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करतात. कष्टकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा गौरव दिन घराघरांत साजरा व्हावा. यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवर्तनवादी विचारक रमेशराव ब्राम्हणकर यांनी केले.येथील जयस्तंभ चौक परिसरातील बसस्थानक परिसरात ओबीसी बहुजन संघटनाच्यावतीने(ता.२)शनिवारला बळीराजा महोत्सव कार्यक्रम
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे, संविधान मैत्री संघाचे प्रा.दिशा गेडाम,अतुल सतदेवे,ओबीसी सेवा संघाचे सी.पी.बिसेन,प्रा.संजीवकुमार रहांगडाले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले,सामाजिक कार्यकर्ते भुपेंद्र वैद्य,बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,हेमराज भेलावे,विदर्भवादी नेते वसंत गवळी यांच्यासह ओबीसी बहुजन संंघटनाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.ब्राम्हणकर पुढे म्हणाल की, या पुढील काळात बळीराजा गौरव महोत्सव गावागावांत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.उपस्थितांना यावेळी अल्पोपहार व चहाचे वितरण करण्यात आले.

गोंदियात ओबीसी बहुजन संघटनांच्यावतीने बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा, महोत्सवात्त अल्पोपहाराचे वितरण

बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण. भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी, दानशूर,सद्गुणी म्हणून विख्यात आहे.बळीचे राज्य अर्थात समतेचे,न्यायाचे राज्य. बळीचे राज्य म्हणजे स्त्रीपुरुष विषमता, जातीभेद, वर्णभेद रहित राज्य. अशा महादानशूर, संविभागी बळीराजाची आठवण दिवाळीला- बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस, शेतकरी आयाबहिणी इडापीडा जावो। बळीचे राज्य येवो।। असे म्हणत सण साजरा केला जात असल्याची माहिती प्रा.दिशा गेडाम यांनी यावेळी दिली.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.