तालुका क्रिडांगण देवरी येथे मतदान जनजागृती

0
22

गोंदिया, दि.11 : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप सेलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुका क्रिडांगण देवरी येथे युवक व युवतींना मॉर्निंग वॉक दरम्यान तसेच क्रिकेट टीमच्या खेळाडूंना व नागरिकांना मतदान जनजागृती बाबत संदेश देण्यात आला. यावेळी आमगाव विधानसभा स्वीप सेलचे नोडल तथा गटविकास अधिकारी देवरी जी.टी.सिंगनजुडे, तालुका नोडल तथा गटशिक्षणाधिकारी के.एस.मोटघरे, विस्तार अधिकारी शिक्षण हरपाल राऊत, मुख्याध्यापक गभने, सहायक शिक्षक लंजे तसेच इतर केंद्रप्रमुख व शिक्षक यावेळी उपस्थित होते.