सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
10

गोंदिया दि.14: खा. प्रफुल्ल पटेल यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून कोरणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते दुर्गा चौकपर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी तीन लाखांचा निधी मंजूर झाला. सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पर्यवेक्षक अशोक गुप्ता यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, पं.स. सदस्य प्रकाश देवधारी, माजी जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर, चनेश पटले, सरपंच संगीता तुरकर, उपसरपंच छन्नू बिसेन, उषा पटले, चैतराम पटले, सविता रामटेके, गोपिचंद बिसेन, हिरदेलाल ठाकरे, प्रीतमलाल तुरकर, झनकलाल पटले व इतर मान्यवर उपस्थित होते.