गोंदिया, दि.13 : लोकशाही प्रधान देशात मतदानाचा मुलभूत अधिकार 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. शासन व प्रशासनाकडून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 40 मतदान केंद्राचे नियंत्रण पूर्णपणे महिलांच्या हाती देण्यात आले आहे. अर्थातच येथील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदारी महिला पार पाडणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आजची महिला ही पुरुषांपेक्षा कमी नसून त्यांच्या बरोबरीने काम करीत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा हा महिला मतदान केंद्राच्या (Pink Polling Station) निर्मितीमागील उद्देश आहे.
अशी आहेत महिला मतदान केंद्र : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ : 112-वडेगाव, 127-बौध्दनगर, 128-कोदामेडी, 129-सडक/अर्जुनी, 160-बाम्हणी/सडक, 242-धाबेटेकडी अ., 244-महालगाव, 257-निलज, 267-मालकनपूर, 285-येरंडी. तिरोडा विधानसभा मतदारसंघ : 78-तिरोडा, 80-तिरोडा, 90-तिरोडा, 109-खैरबोडी, 125-काचेवानी, 252-कुऱ्हाडी, 262-कटंगी बुज., 265-गोरेगाव, 275-हिरडामाली, 285-घोटी. गोंदिया विधानसभा मतदारसंघ : 178-गोंदिया, 179-गोंदिया, 225-गोंदिया, 226-गोंदिया, 227-गोंदिया, 257-गोंदिया, 258-गोंदिया, 259- गोंदिया, 260-गोंदिया, 261-गोंदिया. आमगाव विधानसभा मतदारसंघ : 61-रिसामा, 80-आमगाव, 83-आमगाव, 84-आमगाव, 85-आमगाव, 167-आमगाव खुर्द, 171-सालेकसा, 243-देवरी, 245-देवरी, 248-देवरी.