= डाॅ.सुगत चंद्रिकापुरेची प्रचारात मुसंडी =
अर्जुनी मोर.-अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्ती पक्ष ,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे स्वतंत्र उमेदवार डाॅ.सुगत मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असुन प्रचार रॅली,नुक्कड सभा,व मोठ्या प्रचार सभेच्या माध्यमातुन ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे डाॅ.सुगत चंद्रिकापुरेची बॅट कुणाला आऊट करते की विजयाचा चौकार षटकार मारते याचे गणीत लावने सध्या तरी कठीन आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 19 उमेदवार रिंगणात आहेत.मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे दिलीप बन्सोड ,महायुतीचे ईंजी.राजकुमार बडोले व प्रहारचे डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांचे .मधेच दिसुन येत आहे.निवडणुकीची तारीख जसजसी जवळ येत आहे.तसा निवडणुकीत रंगत चढत आहे. प्रहारचे उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आपल्या निवडणुकीचा माहोल मोठ्या प्रमाणात आपल्या हटके पध्दतीने सुरु केला आहे.अर्जुनी मोर. विधानसभेची ही निवडणुक मोठी विचित्र झाली आहे.मतदार संम्रभात आहेत.या विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांची ऐनवेळी राष्ट्रवादीने तिकीट कापल्याने नाराज झालेले आमदार चंद्रिकापुरे यांनी ताबडतोब धावपळ करुन प्रहार चे अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडु यांची भेट घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सहकार्याने प्रहार च्या बॅट चिन्हावर आपले सुपुत्र डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवीले.आज प्रहारचे उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आपला हायटेक प्रचार सुरु केला असुन निवडणुकीत रंगत आणली असल्याचे दिसुन येत आहे.कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली असुन प्रचार सभेला बच्चुभाऊ कडु,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष यांच्या सभा ही घेण्यात आल्या आहेत. सध्यातरी सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.