गडचिरोली (देसाईगंज):-भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड देसाईगंज येथे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता मानसी (भा.प्र.से.) निवडणूक निर्णय अधिकारी 67-आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांचे मार्गदर्शनानुसार मतमोजणी कामाकरीता एकुण 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली असुन त्यावर मतमोजणी पर्यवेक्षक,सहायक,सुक्ष्म् निरीक्षक यांची व रो-ऑफीसरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोस्टल मतदानाची मोजणी करण्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही कामाकरीता नियुक्त मतमोजणी पर्यवेक्षक,सहायक, सुक्ष्म् निरीक्षक यांचे करीता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तसेच मतदान मोजणीच्या विविध कामांकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांची आढावा सभा तहसिल कार्यालय देसाईगंज येथे पार पडली.
यावेळी मा. प्रिती डुडूलकर व मा.उषा चौधरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार यांनी उपस्थित राहून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतदान मोजणी करीता नियुक्त मतमोजणी पर्यवेक्षक,सहायक व सुक्ष्मनिरीक्षक ईत्यादींच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच या मतदान मोजणी कामाकरीता नियुक्त विविध पथक जसे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहाय्यक पथक, मतमोजणीचे दिवशी प्रत्येक टेबलनिहाय/पथकाकडुन मागणी केल्यानुसार आवश्यक साहित्य पुरवठा धारकाकडून प्राप्त करुन संबंधितास वितरीत करणे. मतमोजणीकरीता आदेशित मतमोजणी पर्यवेक्षक/सहाय्यक आदेशित अधिकारी/कर्मचारी यांचे हजेरीपट तयार करणे व उपस्थिती बाबत नोंद ठेवणे, मतमोजणी पश्चात मतदान यंत्र व साहित्य सुरक्षा कक्षात जमा करणे शाखा, सुरक्षा कक्षामधून मतदान यंत्रे मतमोजणी टेबलवर ने-आण करणे, भोजन/निवास व्यवस्था शाखा, मुनष्यबळ व्यवस्थापन शाखा, मतमोजणी कक्ष शाखा व्हीडीओग्राफी/ CCTV शाखा, ETPBMS स्कॅनिंग करणे, ETPBS/टपाली मतपत्रिका मोजणी शाखा, टॅब्युलेशन पथक/निकालपत्रक तयार करणे शाखा, ओळखपत्र निर्गमन शाखा, वाहन/वाहतूक व्यवस्था शाखा, मिडीया सेंटर शाखा/ Media Center & Public Communicaton Room शाखा, आपत्ती व्यवस्थापन शाखा, विद्यूत पुरवठा शाखा, इंटरनेट व दुरध्वनी सेवा, साहित्य शाखा, सिलींग पथक, रो- ऑफीसर, स्वच्छता शाखा, वैद्यकिय पथक, मा. निवडणूक निरीक्षक अहवाल पथक असे एकुण 22 प्रकारचे पथक तयार करण्यात आलेले आहेत.
त्यासार त्यांना नेमून देण्यात आलेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला व पथक प्रमुखांनी त्यांना देण्यात आलेले पथकांमध्ये कामाचे सुयोग्य वाटप करुन कामाचे सुयोग्य नियंत्रण करावे. ज्या पथकाला त्यांचे कर्तव्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित केलेले पुरवठादार आवश्यक असतील त्यांना आवश्यक वस्तू व सेवा पुरवण्याबाबतचे पुरवठा आदेश निम्नस्वाक्षरीतांच्या स्वाक्षरीने पुरवावेत. तसेच सर्व पथक प्रमुखांनी मतमोजणी संबंधातील नेमूण दिलेल्या कामाचे प्रत्यक्ष मतदान मोजणी प्रक्रियेस सुरुवात पुर्वी पुर्वनियोजन पूर्ण करुन ठेवावे. तसेच आदेशित अधिकारी/कर्मचारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केलेले वैद्य ओळखपत्र जवळ बाळगावेत तसेच मतमोजणी स्थळी मोबाईल फोन व ईतर ईलेट्रानिक संचार साधणे प्रतिबंधीत असल्यामुळे जवळ बाळगू नयेत व मतमोजणीचे ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आरमोरी रोड देसाईगंज येथे वेळेवर म्हणजेच, दिनांक 23/11/2024 रोजी सकाळी 5.00 वाजता पुर्वीच उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या.
या वेळी मतमोजणी करीता नियुक्त मतमोजणी पर्यवेक्षक,सहायक,सुक्ष्म निरीक्षक तसेच विविध कामाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.