23.9 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक;हल्ल्यात देशमुख जखमी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक;हल्ल्यात देशमुख जखमी

0
569

नागपूर:- विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. काटोलमध्ये हा हल्ला झाल्याचे समजते आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक;हल्ल्यात देशमुख जखमी

या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसत असून ते रक्तबंबाळ झाले आहेत. विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपताच काही तासांमध्येच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील बेलफाटाजवळ ही घटना घडली आहे. देशमुख सभेवरुन परतत असताना त्यांच्या कारवर दगडफेक झाली. देशमुख यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.