गोंदिया —तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र अंतर्गत पिंपल्स युनियन पक्षाने उमेदवार रविन्द्र दिलिप सोयाम यांचा चुनाव चिन्ह *ट्रमपॅट* असुन निवडणुक आयोगाने या बाबतीत आधिच सुचना दिल्या होत्या की या चिन्हा ला मराठी आणि इंग्रजी नाव *ट्रम्पेट* द्यावे कारण *राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्ष* यांचा चिन्ह *तुतारी वाजविणारा माणुस* आहे. *तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविकांत (गुड्डू) बोपचे यांचे निवडणुक चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस आहे. आणि विरोधकांनी हां चुकीचा प्रचार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबद संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेला आहे याबाबद *राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यानी निवडणुक अधिकारी यांना तक्रार करुन *पिपल्स युनियन पक्षाचे उमेदवार रविन्द्र दिलिप सोयाम* यांच्यावर योग्य ती कारवाई करुन उमेदवाराची प्रचार सामग्री लवकरात लवकर जप्त करण्याचे निवेदन निवडणुक अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी सदानंद पटले,वाय.टी.कटरे,मेघा बिसेन आदी उपस्थित होते.