आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी बजावला मतदानाचा अधिकार

0
61

गोंदिया,दि.२१ः नक्षलवादी चळवळीत राहिलेल्या परंतु काही वर्षापुर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या संजय उर्फ बिच्चेय सुकलु पुनेम यांने आत्मसमर्पणानंतर सर्वसामान्य जिवन जगत विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्यावर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये भारताचा नागरीक म्हणून मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सदर आत्मसमर्पित माओवाद्याने घर सोडल्यापासून त्याचेकडे कोणतेही कागदपत्र पुरावे नव्हते त्यामुळे कागदपत्र नसल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, तसेच सध्या कार्यरत पोलीस अधीक्षक गोरख भामरे, यांचे निर्देश मार्गदर्शनात आत्मसमर्पण व पुर्नवसन समिती, नक्षल सेल गोंदिया जिल्हा यांचे सहकार्याने त्याचे आवश्यक कागदपत्र उदा. वोटर कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इ. तयार करण्यात आले.आणि त्यास शासनाच्या विवीध योजनाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

सदरचे कागदपत्राचे आधारावर सदर माआवाद्यांने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सदर माओवाद्यास शासनाचे विविध योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस सतत सर्वतोपरी मदत करित आहे.याने भारतीय लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून भारताचा नागरिक म्हणून आपले अमूल्य मतदान केल्याबद्दल त्याचे अभिनंदन, कौतुक केले आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी याद्वारे नक्षल चळवळीत सहभागी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुखकर करावे आणि चांगले जीवन जगावे असे आवाहन केले आहे .